पंजाब किग्जने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट राखून पराभव केला आहे. पंजाबने हा विजय मिळवून सलग दुसरा विजय साजरा केला.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 6 विकेट्स गमावून 131 धावा केल्या आहेत.मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 33 धावा केल्या. पंजाबकडून रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
या धावांसह पंजाब किंग्सला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पंजाबने सहज पूर्ण केले. के एल राहूल ने अर्धशतकी पारी खेळली. तर मयंक 25 वर बाद झाला आणि गेलने 43 धावा केल्या.