क्रीडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन पार पडलं.

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन पार पडलं. या सोहळ्याला मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या भव्य सोहळ्यात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते. त्यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू, नेमबाज गगन नारंग हे सर्व उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजयाची धुरा कायम राखली आहे. महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी विजयी सुरुवात केली. राष्ट्रीय स्पर्धेसारख्या युवा क्रीडा उत्सवांमधून भावी ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू निर्माण होतील. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Texas Flood Update : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 78 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Pune : धक्कादायक, पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न; आरोपी ताब्यात

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा