Prithvi Shaw Attack
Prithvi Shaw Attack Team Lokshahi
क्रीडा

Prithvi Shaw Attack: क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला

Published by : shweta walge

टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गाडीवर मुंबईत हल्ला झाला आहे. क्रिकेटर पृथ्वी शॉ मित्राच्या गाडीत बसला होता. त्यामुळे तिथल्या काही लोकांनी त्याला पुन्हा पुन्हा सेल्फी घेण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिल्याने त्यांनी संतप्त होऊन कारवर हल्ला केला. या हल्ल्याचा आठ जणांवर आरोप आहे. पृथ्वी शॉवरील हल्ल्याप्रकरणी ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

पृथ्वी शॉवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरच्या प्रतीनुसार, आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम १४३, १४८, १४९, ३८४, ४२७, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वी शॉवर बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हल्ला झाला.

क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 2 नावाजलेल्या आणि 6 अनोळखी लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, पृथ्वी शॉ भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक वेळा सलामी दिली आहे आणि तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

ठरलं! BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंच्या खांद्यावर टी-२० वर्ल्डकपची मदार

"दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर काँग्रेस जगाला सांगत होतं, आम्हाला वाचवा...वाचवा"; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

खासदार श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान, पत्रकार परिषदेत म्हणाले; "कोल्हापूरमध्ये महापूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी..."

Devendra Fadnavis : पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार

"काँग्रेसच्या राज्यात ६० वर्ष कुणाचाच आवाज नव्हता, पण मोदींनी...", खुद्द पंतप्रधानांनी स्पष्टच सांगितलं