prithvi shaw  Team Lokshahi
क्रीडा

पृथ्वी शॉची बॅट तळपली; रणजी ट्रॉफीत रचला इतिहास

स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची कमाल दाखवत आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची कमाल दाखवत आहे. पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात एक मोठा विक्रम केला आहे. पृथ्वी शॉने आसामविरुद्धच्या सामन्यात त्रिशतक झळकावून बीसीसीआयच्या सिलेक्टर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने आसामविरुद्धच्या सामन्यात ३७९ धावांची खेळी केली होती. गुवाहाटी येथील अमीनगाव क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पृथ्वी शॉने 400 धावांचा ऐतिहासिक आकडा गाठला आहे. त्याला आसामच्या रियान परागने एलबीडब्ल्यू आऊट केले.

यासह पृथ्वी शॉ हा भारतीय प्रथम श्रेणी आणि रणजी इतिहासातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने संजय मांजरेकरचा विक्रम मोडला आहे. मांजरेकर यांनी 1991 मध्ये हैदराबाद विरुद्ध मुंबई 377 धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या असलेला फलंदाज बी.बी. निंबाळकर आहे. त्यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना सौराष्ट्राविरुद्ध नाबाद 443 धावा केल्या होत्या.

या सामन्यात पृथ्वी शॉने 383 चेंडूत 379 धावा केल्या. या खेळीत त्याने चार षटकार आणि 49 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेटही ९८.९६ होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी तो 240 धावांवर नाबाद परतला. पृथ्वी शॉ थोडा जास्त वेळ क्रीझवर राहिला असता तर त्याने 400 धावांचा विक्रमही केला असता. 598 धावांवर मुंबईची तिसरी विकेट पडली. सध्या मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे सामन्यात शतक झळकावत आहे.

रणजी करंडकातील सर्वोच्च धावसंख्या

1. बीबी निंबाळकर - 443* धावा, महाराष्ट्र - काठियावाड विरुद्ध (1948)

2. पृथ्वी शॉ - 379 धावा, मुंबई - आसाम विरुद्ध (2023)

3. संजय मांजरेकर - 377 धावा, मुंबई - विरुद्ध हैदराबाद (1991)

4. एमव्ही श्रीधर - 366 धावा, हैदराबाद - आंध्र विरुद्ध (1994)

5. विजय मर्चंट - 359* धावा, बॉम्बे - महाराष्ट्राविरुद्ध (1943)

6. सुमित गोहेल - 359* धावा, गुजरात - ओडिशा विरुद्ध (2016)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा