क्रीडा

Lionel Messi | दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला कोरोनाची लागण

Published by : Lokshahi News

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक लिओनेल मेस्सीला कोरोनाची लागण झाली आहे. मेस्सी फ्रेंच फुटबॉल लीग 1 मध्ये पॅरिस सेंट जर्मेन (PSG) क्लबकडून खेळत आहे. 34 वर्षीय मेस्सी आणि क्लबच्या इतर 3 खेळाडूंचा कोविड-19 अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. क्लबने याला दुजोरा दिला आहे.

नुकताच बार्सिलोना संघातून पीएसजी संघात आलेल्या मेस्सीने मानाचा 'बॅलन डी'ओर हा पुरस्कार सातव्यांदा पटकावला होता. सध्या मेस्सी संघासोबत फ्रेंच कप खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यांतर पीएसजी संघात कोरोनाने शिरकाव केला आहे. पीएसजी संघातील मेस्सीसह जुआन बर्नाच, सर्जिओ रिको आणि नथान बीटमाजाला यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मेस्सीसह संघातील कोरोनाबाधित सध्या विलगीकरणात असून त्यांची योग्य ती काळजी मेडीकल टीम घेत असल्याचं पीसएजी संघानं सांगितलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Mahua Moitra On Amit Shah : "अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे"; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त वक्त्तव्य