पी.व्ही. सिंधूने नुकतीच तिची लग्नघटिका समीप आल्याची आनंदाची बातमी दिली होती. काही महिन्यांपूर्वीच सिंधूचा विवाह ठरला होता असं तिच्या वडिलांनी सांगितले. त्याचसोबत तिचे वडिल म्हणाले होते की, जानेवारीपासून तिचे बॅडमिंटनचे वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे सिंधूचा विवाह डिसेंबरमध्ये ठरवण्यात आला आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे 22 डिसेंबरला होणार आहे.
तसेत हैदराबादमध्ये 24 डिसेंबरला तिच रिसेप्शन होणार आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. तिच्या जोडीदाराचे नाव व्यंकट दत्ता साई असे आहे. तिचा 14 डिसेंबरला साखरपुडा पार पडला आणि ते फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले होता. त्यानंतर 20 डिसेंबरपासून पीव्ही सिंधूच्या लग्नसोहळ्याचे विधी सुरू होते, ज्यात मेहंदी, संगीत, हळद अशा कार्यक्रमांचा समावेश होता.
ती 22 तारखेला उदयपूर याठिकाणी व्यंकट दत्ता साई यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. लग्नसोहळ्या दरम्यान सिंधू आणि वेंकट यांनी ऑफव्हाईट आणि गोल्डन रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहेत. गजेंद्र सिंह शेखावत जे जोधपूरमधील सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री आहेत, त्यांची देखील उपस्थिती या लग्नात दिसून आली. त्यांनी लग्नातील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.