क्रीडा

Rahul Dravid: राहुल द्रविड पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज, KKR नव्हे तर ‘या’संघासह दिसणार प्रशिक्षकाच्या भूमिकेत

टी-20 विश्वचषक 2024 चे विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने विश्वचषक जिंकण्यात बाजी मारली.

Published by : Team Lokshahi

टी-20 विश्वचषक 2024 चे विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने विश्वचषक जिंकण्यात बाजी मारली. राहुल द्रविडने ऑक्टोबर 2021 पासून सीनियर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. आता भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड विश्वचषक जिंकल्यानंतर आयपीएलमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. राहुल द्रविड कोलकाता नाईट रायडर्स या संघासाठी प्रशिक्षक म्हणून दिसणार असल्याची चर्चा सुरु होती.

इतक्यातच राहुल द्रविड कोलकाता नाईट रायडर्स संघांचे प्रशिक्षक न होता ते आता राजस्थान रॉयल्स या संघासाठी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. तरी लवकरच याबाबतची घोषणा केली जाणार आहे. राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्स संघासाठी 2014 आणि 2015 मध्ये मेन्टॉर म्हणून ही काम केले आहे. यामुळे राहुल द्रविडचे राजस्थान रॉयल्ससोबत जुने नाते असल्याचे समजते.

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स लीग टी-२० चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स संघाने खेळला होता. तर आयपीएलच्या प्लेऑफमध्येही हा संघ पोहोचला होता. यासोबत २०१५ मध्ये हा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. यापूर्वी ही राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्स या संघासह दिल्ली कॅपिटल्स या संघासाठी ही प्रशिक्षक म्हणून आपली कामगिरी बजावली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली