दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ९ मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामान्यामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे दुबईतील क्रिकेटप्रेमी हे एका रोमाचंक सामान्याचे साक्षीदार राहणार आहेत. या रोमाचंक सामान्याला काही तास उरले असता, याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने एक अंदाज वर्तवला आहे. या सामान्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. जर पाऊस पडला तर ९ मार्चचा सामना ज्या ओव्हरला थांबेल त्याच ओव्हरपासून तो थांबलेला सामना 10 मार्चला सुरु होईल. त्यामुळे दोन्ही संघाना समान संधी मिळेल.
दुबईच्या सामान्यादरम्यान कसे वातावरण असणार
रविवारी हवामान अंदाजानुसार आकाश निरभ्र असेल, दुपार उन्हाची शक्यता आहे, ज्यामुळे पावसामुळे अंतिम सामान्यात कोणतीही अडथळा येणार नाही. खेळाच्या पहिल्या सहामाहीत तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आत राहण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळ होत असताना ते 20अंश सेल्सिअसच्या मध्यापर्यंत थंड होण्याची शक्यता आहे.
भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफीच्या फेरीत
भारताने आत्तापर्यंत अनेक सामाने या मैदानावर खेळले आहे. या स्पर्धेच्या उंपात्य फेरीत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ४ गडी राहून विजय मिळवला होता. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. भारताने याआधी 2013 मध्ये विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर 2017 रोजी पाकिस्तानकडून भारत पराभूत झाला. भारत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.