क्रीडा

IND vs AUS Final: वर्ल्ड कपच्या मेगाफायनलवर पावसाचं सावट?

Published by : Team Lokshahi

वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्याची क्रिकेटप्रेमींना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी 19 नोव्हेंबरला म्हणजेच आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्व जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. हा सामना भारताने जिंकल्यास टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन बनणार आहे. आजच्या सामन्यात पाऊस पडल्यास पुढे काय होईल? आज अहमदाबादमधील हवामान आणि नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी  कशी असेल, याबाबत सविस्तर जाणून घ्या. तसेच ऑस्ट्रेलिया संघालाही सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. या सामन्यात कोण जिंकणार? हे आज स्पष्ट होणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय विश्वचषक 2023 ची अंतिम फेरी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आज अहमदाबादमध्ये आकाळ निरभ्र राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी संपूर्ण हवामान स्वच्छ असेल आणि दिवसभरात भरपूर सूर्यप्रकाश असेल. पावसाची शक्यता 0% आहे. रविवारी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत तापमान 32°C ते 33°C दरम्यान राहील.

आजचा ऐतिहासिक सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअममध्ये होत असून यामध्ये 1,30,000 प्रेक्षक सामना पाहू शकतात. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर धावांचा पाऊस पडू शकतो. फलंदाजांची येथे चांदी होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीला पोषक आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे. गोलंदाजांनाही येथे थोडी मदत मिळण्याची शक्यता आहे.

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक