क्रीडा

RR VS DC: राजस्थान रॉयल्सचा दिल्ली कॅपिटल्सने केला 12 धावांनी पराभव

Published by : Dhanshree Shintre

आयपीएल 2024 च्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. राजस्थानकडून आवेश खानने फक्त 4 धावा दिल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानसाठी प्रथम रियान परागने 84 धावांची नाबाद खेळी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी आपले काम चोख बजावत शानदार विजय मिळवला. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव आहे.

दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज होती. परंतू, आवेश खानने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघाला 12 धावांनी विजय मिळवून दिला. दिल्लीसाठी ट्रस्टन स्टब्सने 23 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार मारुन 44 धावा केल्या, मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

दरम्यान, प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्स टीमला निर्धारित ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 173 रन्स करता आल्या. डेव्हिड वॉर्नरने शानदार खेळी केली, पण तो हाफ सेंचुरीपासून अवघा एक रन दूर राहिला. त्याचवेळी ऋषभ पंत 28 धावा करून बाद झाला. राजस्थानच्या नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग ईलेव्हन

ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर ), डेव्हीड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन

संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि आवेश खान.

इंडिया आघाडीची 'या' दिवशी होणार मुंबईत प्रचारसभा

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14वर; 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना