देशभरात कोरोनाचा विस्फोट झाला असताना आता आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता आयपीएलचा उर्वरीत हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हा हंगाम पूर्ण होणार कि नाही ? यावर BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली आहे.
"आम्ही लवकरच भेटणार असून स्थगित करण्यात आलेला हंगाम पूर्ण कधी करता येईल, त्याविषयी निर्णय घेतला जाईल. यासाठी आम्हाला स्पर्धा पूर्ण करण्याची कधी संधी मिळेल, ते देखील पाहावं लागणार आहे", असं राजीव शुक्ला म्हणाले आहेत.
"बीसीसीआयनं तूर्तास आयपीएल स्पर्धा स्थगित करून एक चांगला निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा आहे तिथूनच पुन्हा सुरू करण्याबाबत किंवा तिचं पुन्हा नियोजन करण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. देशातली करोनाची परिस्थिती लक्षात घेता खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी हा निर्णय हितकारक आहे", असं ट्वीट राजीव शुक्ला यांनी केलं आहे.