क्रीडा

Tokyo 2020 : सुवर्णपदक हुकलं; रवी दहियाला रौप्यपदक

Published by : Lokshahi News

टोकिओ ओलीम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात रवीकुमार दहियाचा पराभव झाला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी 7-4 च्या फरकाने पराभूत झाला. प्रतिस्पर्धी जावूर युगुयेवने अप्रतिम कमागिरी करत सुवर्णपदक जिंकलं. तर रवीच्या पदरात रौप्यपदक पडलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात अजून एक पदकाची नोंद झाली आहे.

रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा सामन्यातूनच बाहेर फेकले होते. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला. त्यामुळे ​रवीने नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर आज कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियाच्या जावूर युगुयेवशी झाला. पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. प्रतिस्पर्धी जावूर युगुयेवने अप्रतिम कमागिरी करत सुवर्णपदक जिंकलं. तर रवीच्या पदरात रौप्यपदक पडलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा