Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Team lokshahi
क्रीडा

जडेजा, सीएसकेमध्ये वादाची ठिणगी

Published by : Saurabh Gondhali

इंडियन प्रीमिअर लीगमधील( IPL) सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) ताफ्यात नेमकं काय चाललंय याचा अंदाज बांधणे अवघड झालंय... आयपीएल २०२०मध्ये सुरेश रैना ( Suresh Raina)विरुद्ध CSK या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर आयपीएल २०२१मध्ये चेन्नईने अलगद रैनाला दूर लोटले. आता आयपीएल २०२२मध्ये CSK vs Ravindra Jadeja हा वाद रंगताना दिसतोय... 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) कर्णधारपद सोडतो काय आणि रवींद्र जडेजाकडे ती जबाबदारी सोपवली जाते काय... पण, ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवल्यानंतर जडेजाची उचलबांगडी होते आणि सूत्रं पुन्हा धोनीच्या हाती सोपवली जातात. CSK व्यवस्थापनाने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले, त्याने रवींद्र जडेजा प्रचंड नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे. कर्णधारपद गेल्यानंतर जडेला दुखापतीमुळे बाकावर बसला आणि नंतर आयपीएल २०२२मधून माघार घेत असल्याचा निर्णय घेतला. कर्णधारपदावरून हटवल्यामुळे जडेजा नाराज असून त्याचे व CSK च्या नात्याची घट्ट नाळ तुटणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

दुसरीकडे, CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मात्र जडेजा हा सीएसकेच्या प्रत्येक योजनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले.  ते म्हणाले,‘ सोशल मीडियावर मी काहीही फॉलो करीत नाही. तेथे काय सुरू आहे याची मला माहिती नसते. व्यवस्थापनाकडून काहीही अडचण नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो.  जडेजा हा सीएसकेच्या भविष्यातील योजनेत सहभागी असेल.’  

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ