(Jitesh Sharma) IPL 2025 च्या विजेत्या RCB संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मैदानावर त्याच्या तडाखेबाज खेळीने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवले असले तरी, इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानात त्याला एक वेगळाच अनुभव आला.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीदरम्यान जितेशला लॉर्ड्स मैदानात प्रवेश मिळवताना अडचण आली. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात जितेश शर्मा गर्दीमध्ये उभा असून सुरक्षारक्षकाला आपली ओळख सांगताना दिसतो. "मी भारतीय क्रिकेटपटू जितेश शर्मा आहे" असं त्याने वारंवार सांगूनही, सुरक्षारक्षकाने त्याला आत सोडण्यास नकार दिला.
यानंतर जितेशने आत उपस्थित असलेल्या RCB संघाच्या मार्गदर्शक दिनेश कार्तिकला हाक मारली, मात्र त्याच्यापर्यंत तो आवाज पोहचला नाही. अखेर जितेशने त्याला फोन केला आणि त्यानंतर त्याला मैदानात प्रवेश मिळाला. मैदानात गेल्यानंतर दोघंही थोडावेळ एकमेकांशी संवाद करताना दिसले. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.