आयपीएलच्या 14 व्या पर्वातील पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबीने 'रॉयल' विजय मिळवत हंगामाला दणक्यात सुरुवात केली. अटीतटीच्या सामन्यात हा विजय आरसीबीने मिळवला आहे. याबरोबर सलामीचा सामना गमावण्याची मुंबईचा रेकॉर्ड कायम राहिला.
आरसीबीच्या वॉशिंग्टन सुंदर 10, विराट कोहली 33, रजत पाटीदार 8, ग्लेन मॅक्सवेल 39, , शाहबाज अहमद डेनियल क्रिश्चियन 1, काईल जेमीसन 4 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक धावा एबी डिविलियर्स 45 केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने 159 धावा केल्या होत्या. यावेळी रोहित 19 धावांवर माघारी परतला. सूर्यकुमारने 31 धावावर बाद झाला. क्रिस लीनने सर्वाधिक 49 धावा केल्या. ईशान किशन 28, हार्दिक पंड्या 13 वर बाद झाला. या बळावर मुंबईने 159 धावांचा डोंगर उभारला. दरम्यान आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 160 धावांचे आव्हान दिले होते.