rishabh pant  team lokshahi
क्रीडा

india vs england : ऋषभ पंतची शानदार खेळी, झळकावले शतक

ऋषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक ठरले

Published by : Shubham Tate

rishabh pant century : ऋषभ पंतचा धमाका इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टनवर पाहायला मिळाला. इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत पंतने शानदार शतक झळकावले. पंतने शतक झळकावण्यासाठी केवळ 89 चेंडू घेतले आणि 15 चौकार आणि एक षटकार लगावला. ऋषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक ठरले. (rishabh pant century in edgbaston test india vs england 5th test match)

जडेजासोबत चांगली भागीदारी केली

ऋषभ पंतची ही खेळी भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची होती कारण एका क्षणी भारतीय संघाने 98 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या आणि 150 धावा करणे देखील कठीण होते. अशा स्थितीत पंत आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय डावाचा ताबा घेतला.

टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

ऋषभ पंतने शतक झळकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतला 5 डावात केवळ 58 धावा करता आल्या. आयपीएलमध्येही त्याची खेळी खराब होती. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने आयपीएल 2022 मध्ये 14 सामने खेळून 30.90 च्या सरासरीने 340 धावा केल्या. यादरम्यान ऋषभ पंतची सर्वोत्तम धावसंख्या ४४ होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा