Admin
क्रीडा

ऋतुराज गायकवाडने एकाच षटकात 7 षटकार मारत रचला इतिहास

आज म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेश विरुद्ध इतिहास रचला.

Published by : Siddhi Naringrekar

आज म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेश विरुद्ध इतिहास रचला. गायकवाडने 159 चेंडूत 220* धावांची नाबाद खेळी खेळली ज्यात त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले. एवढेच नाही तर या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आणखी एक विक्रम केला. त्याने उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंगला एका षटकात 7 षटकार ठोकले.

एका षटकात 7 षटकार. हा सर्व प्रकार महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या षटकात घडला. या षटकात शिवा सिंगनेही नो बॉल टाकला ज्यात ऋतुराजनेही शानदार षटकार ठोकला. ऋतुराज गायकवाडच्या दहशतीने गोलंदाज पूर्णपणे हादरला. गायकवाडच्या द्विशतकामुळे महाराष्ट्राने 50 षटकांत 5 गडी गमावून 330 धावा केल्या. या सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्याशिवाय अन्य कोणताही फलंदाज महाराष्ट्रासाठी विशेष काही करू शकला नाही. दोन फलंदाजांनी 37-37 धावांची खेळी केली, पण बाकी सर्वजण दुसऱ्या टोकाकडून ऋतुराजच्या खेळीचा आनंद घेत राहिले. या सामन्यात यूपीच्या गोलंदाजांवरही वाईट वेळ आली, शिवा सिंग 9 षटकात 88 धावा देऊन सर्वात महागडा ठरला.

25 वर्षीय ऋतुराज गायकवाडने डावाच्या 49व्या षटकात 7 षटकारांसह एकूण 43 धावा केल्या. ज्यामध्ये एक चेंडू नो-बॉल होता, असं करणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

• 48.1 षटके - 6 धावा

• 48.2 षटके - 6 धावा

• 48.3 षटके - 6 धावा

• 48.4 षटके - 6 धावा

• 48.5 षटके - 6 धावा (नो-बॉल)

• 48.5 षटके - 6 धावा (फ्री-हिट)

• 48.6 षटके - 6 धावा 6 धावा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."