India Vs Pakistan Team Lokshahi
क्रीडा

T20 World Cup 2022 : रोहित शर्मा आणि बाबर आझमचा विश्वचषकाआधी खास फोटोशुट

क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तानमधील युद्ध किती महत्त्वाचे आणि मोठे आहे हे आयसीसीला माहीत आहे, त्यामुळेच कर्णधारांचे फोटोशूट अशा प्रकारे झाले आहे.

Published by : Sagar Pradhan

ऑस्ट्रेलियामध्ये काही दिवसात T20 विश्वचषक 2022ला सुरुवात होणार आहे. अशातच या स्पर्धेआधी मेलबर्न येथे सर्व 16 संघांचे कर्णधार एकत्र आले आहे. पहिल्यांदाच घडले जेव्हा सर्व कर्णधारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली,

ज्या दरम्यान विद्यमान चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर सर्व संघांचे कर्णधार उपस्थित होते.

येथे कर्णधारांनी T20 विश्वचषक 2022 ची ट्रॉफी, तसेच सर्व कर्णधारांच्या फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम यांनी एकत्र फोटोशूट केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला सामना होणार आहे, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या फोटोशूटने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनवला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या