क्रीडा

Rohit Sharma Blessed with Boy: रोहितने दिली ज्युनियर हिटमॅनची खुश खबर, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली गोड माहिती...

ज्याला हिटमॅन म्हणून देखील ओळखल जातं अशा या हिटमॅनच्या घरी पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.

Published by : Team Lokshahi

रोहित शर्मा हे नाव म्हणजे क्रिकेटविश्वातील नावाजलेलं नाव असं म्हणायला काही हरकत नाही. रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी केली असली तरी क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा मुंबईचा राजा आणि ज्याला हिटमॅन म्हणून देखील ओळखल जातं अशा या हिटमॅनच्या घरी पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रितिका सजदेह प्रेग्नेंन्ट असल्याचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यादरम्यान ते दोघ पुन्हा आई-बाबा होणार आहेत अशा चर्चांना उधान आलं होत. मात्र रोहित शर्माने त्याबद्दल कोणतीही माहिती मीडियाला दिली नव्हती. मात्र आता त्याने ही गोड बातमी त्याच्या पोस्टद्वारे जगजाहीर केली आहे.

त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिला आहे आणि याबद्दलची ऑफिशियल घोषणा रोहित शर्माने त्याच्या पोस्टद्वारे केली आहे. पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये त्याने 15.11.2024 ही तारीख टाकली आहे. १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांच्या मुलाचा जन्म झाला ज्याला आता चाहते ‘ज्युनियर हिटमॅन’असं म्हणत आहेत. तर मुलाच्या जन्मामुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही, अशा चर्चा सुरु आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली