क्रीडा

Rohit Sharma Perth Test: पहिल्या पर्थ कसोटी रोहित शर्मा नाही! तर "हा" खेळाडू सांभळणार संघाची कमान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

22 नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली पर्थ कसोटी पार पाडली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र त्यासंदर्भात एक महात्तवाची बातमी समोर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून समोर आली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या पर्थ कसोटी सामन्याला फारचं कमी दिवस उरले आहेत.

रोहित शर्मा या कसोटीत भाग घेत नसल्याचे कारण-

त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिला आहे आणि याबद्दलची ऑफिशियल घोषणा रोहित शर्माने त्याच्या पोस्टद्वारे केली आहे. पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये त्याने 15.11.2024 ही तारीख टाकली आहे. १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांच्या मुलाचा जन्म झाला ज्याला आता चाहते ‘ज्युनियर हिटमॅन’असं म्हणत आहेत. तर मुलाच्या जन्मामुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्याला त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे यासाठी तो या पहिल्या कसोटीत अनुपस्थितीत राहणार आहे.

रोहित शर्माच्या जागी "या" खेळाडूच्या हाती संघाची कमान-

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा खेळू शकला नाही तरी त्याच्या जागी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ही उपकर्णधार म्हणून संघाचे नेतृत्त्व करेल. तर रोहित शर्मा ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये सामील होईल म्हणजेच तो दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. तसेच टीम इंडियासमोर यावेळेस मोठे आव्हान असेल मात्र केएल राहुलला ही जबाबदारी मिळते की अभिमन्यू ईश्वरन याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच