IPL 2022  Team Lokshahi
क्रीडा

IPL 2022 : 72 चेंडू आणि नऊ गडी राखून हैदराबादचा 'रॉयल' विजय

Published by : left

सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 72 चेंडू आणि नऊ गडी राखून पराभव केला. हैदराबादने यंदाच्या हंगमातील सलग पाचवा विजय नोंदवला आहे. तर आरसीबीचा हा तिसरा पराभव आहे.

आरसीबीने दिलेले 69 धावांचं मापक आव्हान हैदराबादने आठ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने 47 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधान केन विल्यमसन 16 तर राहुल त्रिपाठी 7 धावा काढून नाबाद राहिला. आरसीबीकडून हर्षल पटेल याने एकमेव विकेट घेतली.

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मार्को जानसन आणि नटराजन यांच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचा संपूर्ण संघ 16.1 षटकात 68 धावांत संपुष्टात आला. आरसीबीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुयेश प्रभुदेसाईनं आरसीबीकडून सर्वाधिक धावा कोल्या. सुयेश प्रभुदेसाईने 15 धावांची खेळी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा