Sachin Tendulkar 
क्रीडा

KKR ने आयपीएलची फायनल जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरनं दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला,"त्यांच्या सर्व गोलंदाजांनी..."

कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या आयपीएलच्या फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली आणि तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला.

Published by : Naresh Shende

Sachin Tendulkar Tweet On KKR : कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या आयपीएलच्या फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली आणि तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. सनरायजर्स हैदराबादने केकेआरला ११४ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कोलकाताने १०.३ षटकात हे लक्ष्य गाठून आयपीएलचं जेतेपद मिळवलं. त्यानंतर भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या एक्सवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्वीटरवर काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

एक्सवर म्हटलं, केकेआरने सतत चमकदार कामगिरी केलीय. त्यांच्या फलंदाजांनी या हंगामात धमाकेदार सुरुवात केली. तसंच त्यांच्या गोलंदाजांनीही सामन्यांमध्ये जलवा दाखवला. फायनलमध्ये त्यांच्या सर्व गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोलंदाजांनी विकेट घेतले आणि रन चेजलं सोपं केलं. फ्रँचायजीसाठी तिसरी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफचं धन्यवाद. गंभीर आणि शाहरुख. हैदराबाद, ज्यांनी गेल्या दोन महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली. परंतु, फायनलमध्ये त्यांना विजय मिळवता आला नाही.

केकेआरने गौतम गंभीरच्या कॅप्टन्सीत २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. आता केकेआराचा मेंटॉर गंभीरने अप्रतिम रणनीती आखून केकेआरला तिसरी ट्रॉफी जिंकवून दिली. तसच मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी केकेआरला आयपीएलच्या १७ व्या हंगामातील किताब जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा