क्रीडा

Sania mirza Retirement: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा

Published by : Lokshahi News

भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania mirza) निवृत्तीची घोषणा केली आहे. सानियाने बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन (Austalian open), 2022 मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या डावात पराभवानंतर निवृत्तीची घोषणा केली. 2022 हा माझा शेवटचा मोसम असेल. तो मला पूर्ण करायचा आहे असे सानियाने सांगितले.

सानिया मिर्झा म्हणाली, "मी ठरवलं आहे की हा माझा शेवटचा सीजन असणार आहे. मी या सीजनमध्येही पूर्णपणे खेळू शकेन का? हे ही मला माहित नाही. स्लोवेनियाच्या काजा जुवान आणि तमारा जिदानसेकयांनी पहिल्या फेरीत डैवैत सानिया आणि किचेनोक यांना 6-4 आणि 7-6 अशा दोन सेट्समध्ये मात दिली.

ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सामना पराभूत झाल्यानंतर सानिया म्हणाली, 'निवृत्ती घेण्याची काही कारणं आहेत. मला वाटतं मला सामन्यासाठी पूर्ण फिट होण्यासाठी मला अधिक वेळ लागत आहे. मी इतका प्रवास करुन माझ्या 3 वर्षाच्या मुलाची प्रकृतीही धोक्यात टाकत आहे. मला वाटतं माझी प्रकृती नीट साथ देत नसून गुडघेही फार दुखतात. त्यामुळेच मला सामन्यासाठी फिट होण्यास जास्त वेळ लागत आहे.'

विजेतेपद
सानिया मिर्झा हिने महिला डबल्समध्ये 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बलडन आणि यूएस ओपन या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसंच मिक्स्ड डबल्समध्ये तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन या स्पर्धा जिंकल्या आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या