Sanjana Ganesan | viral video team lokshahi
क्रीडा

Sanjana Ganesan : बुमराहच्या पत्नीने इंग्लंडला केलं खतरणाक ट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

बुमराहच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल

Published by : Shubham Tate

Sanjana Ganesan : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची झलक पाहायला मिळाली. तो या सामन्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी चेष्टेचा विषय ठरली. एकीकडे बुमराह ओव्हलवर इंग्लंडच्या फलंदाजांना त्रास देत होता, तर दुसरीकडे त्याची पत्नी संजना गणेशन मैदानाबाहेरील ब्रिटिशांना ट्रोल करताना दिसली. (sanjana ganesan trolls england batters viral video ind vs eng odi jasprit bumrah)

संजना गणेशन ट्रोल

पहिल्या वनडेत इंग्लंडचे फलंदाज खाते उघडण्यासाठी धडपडताना दिसले. ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला 110 धावांत गुंडाळत 10 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, बुमराहची पत्नी संजना गणेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अँकरिंग करताना इंग्लंड फलंदाजांना ट्रोल केले आहे. ज्याला पाहून चाहतेही खूप एन्जॉय करत आहेत.

बुमराहने या सामन्यात कहर केला

या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. त्याने पहिल्याच षटकात 2 बळी घेत इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. या सामन्यात त्याने 7.2 षटके टाकली, ज्यात त्याने 2.59 च्या इकॉनॉमीने फक्त 19 धावा दिल्या आणि 6 विकेट घेतल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा