Shafali Verma  
क्रीडा

वाह शेफाली वाह! महिला टेस्ट क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड; 'हा' कारनामा करणारी ठरली पहिली फलंदाज

आफ्रिकेविरोधात नाणेफेक जिंकून सलामीला उतरलेल्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने अप्रतिम फलंदाजी केली. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत शेफाली वर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Published by : Naresh Shende

Shafali Verma Double Hundred World Record : दक्षिण आफ्रिकेविरोधात वनडे सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी इतिहास रचला. आफ्रिकेविरोधात नाणेफेक जिंकून सलामीला उतरलेल्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने अप्रतिम फलंदाजी केली. आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत शेफाली वर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. महिला कसोटी सामन्यात सर्वात वेगवान द्विशतक ठोकणारी एकमेव फलंदाजी बनली आहे. शेफालीनं १९४ चेंडूत (२०५) द्विशतक पूर्ण केलं.

याशिवाय भारताकडून पहिल्या इनिंगमध्ये स्मृीत मंधानानेही जबरदस्त फलंदाजी केली. मंधानाने १४९ धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये २९२ धावांची भागिदारी झाली. शेफाली आणि मंधानाने केलेली २९२ धावांची भागिदारी महिला कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी भागिदारी आहे.

Shafali Verma And Smriti Mandhana

महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी ओपनिंग भागिदारी करणारे फलंदाज

स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा - २९२ धावा

किरन बलूच आणि साजिदा शाह

कॅरोलिन एटकिन्स आणि ऐरन ब्रिंडल - २०० धावा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Raj Thackeray : 'मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर...' राज ठाकरे पोस्ट करत नेमकं काय म्हणाले?

Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी