क्रीडा

T20 World Cup | भारतीय संघात शार्दूल ठाकूरची एन्ट्री

Published by : Lokshahi News

आगामी टी-20 विश्वचषकाला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता भारतीय संघात शार्दूल ठाकूरची निवड झाली आहे. तर अक्षर पटेलला राखीव खेळाडूंमध्ये बसवण्यात आलं आहे.

बीसीसीआयने याआधीच अंतिम 15 खेळाडूसंह 3 राखीव खेळाडूंची यादी जाहीर केली होती. पण भारतीय संघ हा थेट सुपर-12 मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करण्याची मुभा भारताला होती. त्यात पहिला बदल झाला असून शार्दूल ठाकूरला संघात स्थान देण्यात आलं असून अक्षर पटेलला राखीव खेळाडूंमध्ये बसवण्यात आलं आहे.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन
राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा