क्रीडा

अभिनेता सोनू सूदने रायफल दिलेल्या ‘त्या’ नेमबाजाची आत्महत्या

Published by : Lokshahi News

राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायक हिने आत्महत्या केली आहे.कोनिकाने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.या नवोदित खेळाडूच्या निधनाने क्रीडा जगताला धक्का बसला आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोनिकाला तिच्या खेळासाठी रायफल भेट दिली होती. कोनिका लायक पूर्वी जुन्या रायफल वापरायची. त्या रायफली तिच्या प्रशिक्षकांच्या किंवा मित्रांच्या असायच्या. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती त्याच जुन्या रायफलने शूटिंग करत असे. यानंतर, जेव्हा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदला तिच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याने या नवोदित खेळाडूला मार्च महिन्यात एक नवीन रायफल भेट दिली. जेणेकरुन ती तिच्यातील कलागुणांना आणखी वाव देऊ शकेल.

जयदीप कर्माकर यांनी कोनिकाला उत्तम प्रशिक्षणासाठी अकादमीत नेले होते. 'ट्रिब्यून'शी संवाद साधताना अकादमी व्यवस्थापनाने सांगितले की, गेल्या १० दिवसांपासून कोनिका प्रशिक्षणासाठी फार कमी वेळा सत्रांमध्ये येत असे. जयदीप कर्माकर यांनी, "हे खूपच धक्कादायक आहे. पूर्वी ती तिचा व्यायाम व्यवस्थित करत होती. मात्र काही दिवसांनी ती प्रशिक्षण सत्रात अनियमितपणे येत होती. यामागे काय कारण आहे हे मला माहीत नाही, असे म्हटले." कर्माकर यांनी सांगितले की ती लवकरच लग्न करणार होती. काय झाले आणि कोणत्या दबावाखाली त्यांनी हे पाऊल उचलले हे मला खरोखरच माहीत नाही, असे कर्माकर म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?