क्रीडा

Shooting Competition: अंजुमला मिळाले कांस्यपदक; पुरुषांच्या सांघिक गटात भारताला रौप्य

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत (Shooting Competition) रविवारी महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये भारताच्या अंजुम (anjum) मुदगिलने कांस्यपदकाची मिळवले.

Published by : Siddhi Naringrekar

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत (Shooting Competition) रविवारी महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये भारताच्या अंजुम (anjum) मुदगिलने कांस्यपदकाची मिळवले. शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अंजुमने सहाव्या स्थानी राहत अंतिम फेरी गाठली होती. अंजुमचे विश्वचषक स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. एक कांस्य आणि एक रौप्यपदक मिळवत भारताने एकूण ११ पदकांसह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. भारताच्या खात्यावर चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यपदके आहेत.

अंजुमने अंतिम फेरीत ४०२.९ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. जर्मनीच्या अ‍ॅना जॅन्सेनने (४०७.७ गुण) सुवर्ण आणि इटलीच्या बार्बरा गॅमबारोने (४०३.४ गुण) रौप्यपदक आपल्या नावे केले. शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अंजुमने सहाव्या स्थानी राहत अंतिम फेरी गाठली होती. अंजुमचे विश्वचषक स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. गेल्या महिन्यात बाकू येथे झालेल्या विश्वचषकात तिने याच प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.

पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात संजीव राजपूत, चैन सिंह आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर या भारतीय त्रिकुटाने रौप्यदपक जिंकले. पीटर निमबुरस्की, फिलिप नेपेयचाल आणि जिरी प्रिव्रात्स्की यांचा समावेश असलेल्या चेक प्रजासत्ताकच्या संघाने चुरशीच्या लढतीत १६-१२ अशी सरशी साधत सुवर्णपदक कमावले. भारताच्या त्रिकुटाने पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवत सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज