Shubhman gill, Elon Musk & Swiggy Team Lokshahi
क्रीडा

शुभमननं एलॉन मस्कला टॅग केलेल्या ट्वीटनंतर गिल होतोय प्रचंड ट्रोल!

एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटर विकत घेतल्यापासून ते प्रचंड चर्चेत आले

Published by : Vikrant Shinde

एलॉन मस्क यांनी अलिकडेच ट्विटर (Elon Musk bought Twitter) विकत घेतले. तेव्हापासून एलॉन मस्क हे प्रचंड चर्चेत आले आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेकांनी त्यांचे कौतूक केले तर, अनेकांनी त्यांना ट्रोलही केले. आता क्रिकेटर शुभमन गिल (Cricketer Shubhman Gill) याने एलॉन मस्क यांना टॅग करून एक ट्वीट केले आहे.

शुभमनचे ट्वीट:

शुभमन याने स्विगीच्या सेवेबाबत तक्रार करणारं एक बोटक ट्वीट केलं आहे. ज्यात त्याने म्हटलं आहे, 'एलोन मस्क, कृपया स्विगी खरेदी करा जेणेकरून ते वेळेवर अन्न वितरीत करू शकतील.' ह्या ट्वीटमध्ये त्याने एलॉन मस्क यांनाही टॅग केले आहे.

स्विगीचा रीप्लाय:

स्विगीकडून ह्या ट्वीटवर स्विगीकडून दोन रीप्लाय देण्यात आले आहेत. पहिल्या रीप्लायमध्ये स्विगीने शुभमनला मेसेज करत त्याच्या ऑर्डरची माहिती घेतल्याचं सांगत त्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

स्विगीचा दुसरा रीप्लाय:

स्विगीने दिलेल्या दुसऱ्या रीप्लायमध्ये स्विगीने शुभमनला डिवचत असे म्हटले, 'आम्ही तरीही टी-२० क्रिकेटमधील तुमच्या फलंदाजीपेक्षा वेगवान आहोत.' ह्या ट्विटमुळे सध्या शुभमन गिल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

दोन्ही रीप्लाय स्विगीकडून आले असले तरी स्विगीकडून आलेला दुसरा रीप्लाय हा स्विगीच्या नावाने सुरू केलेल्या बनावट अकाऊंट वरून करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी