ॲडलेडमध्ये खेळल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारातीय संघाचा 10 विकेट्ससह दाणून पराभव झाला, ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाचा विजय झाला आसून मालिकेत 1-१1ची अशी बरोबरी झाली आहे. पण या मालिकेदरम्यान मोहम्मद सिराज त्याच्या आक्रमतेमुळे सध्या चर्चेक येताणा दिसून येत आहे. नुकतचं लाबुशेनने फलंदाजी करत असताना सिराजला पुर्ण तयारीत असलेला पाहून चेंडू फेकण्यापासून थांबवले होते, त्याच संतापात सिराजने चेंडू जोरात लाबुशेनच्या दिशेने फेकला एवढेच नाही तर लाबुशेनकडे पाहून सिराजने स्लेजिंग देखील केले होते.
तर आता सिराजचा वाद हा ट्रॅव्हिस हेडसोबत पाहायला मिळाला आहे. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना बाद केले होते. सिराजने उत्कृष्ट यॉर्कर टाकत हेडला क्लीन बोल्ड केले. ट्रॅव्हिस हेडची विकेट भारतीय संघासाठी खास होती कारण त्याने 140 धावांची खेळी खेळली होती जी भारतीय संघासाठी धोक्याची ठरत होती. सिराजने हेडला बाद केल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी हेड म्हणाला होता की, मी सिराजचे कौतुक केले होते, पण त्याने वेगळा अर्थ घेतला... मोहम्मद सिराजच्या प्रतिक्रियेने मी निराश झालो आहे.
हेडने खोटं सांगितलं आहे…- मोहम्मद सिराज
हेट आणि मोहम्मद सिराज यांच्यात झालेल्या वादानंतर हेटने पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली होती आणि त्याने दिलेली प्रतिक्रिया सपशेल खोटी असल्याच भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने सांगितलं आहे.
यावेळी सिराज म्हणाला की, हेडने असं सांगितलं की त्याने माझं कौतुक केल... तो मला म्हणाला की मी मैदानावर मला चांगला चेंडू टाकला! पण तो असं काहीच म्हणाला नाही... सगळे जण टीव्हीवर पाहत होते, मी त्याला काहीच म्हणालो नव्हतो. मी विकेटचं सेलिब्रेशन करत होतो आम्हीही प्रत्येकाचा मान ठेवतो, सन्मानाने वागतो, मी प्रत्येकासोबत मान सन्मान देऊनच बोलतो आम्हाला पण माहित आहे की क्रिकेट हा जेंटलमॅन्सचा गेम आहे... ट्रॅव्हिस हेडने हा विषय ज्या प्रकारे सर्वांसमोर मांडला ते त्याला आवडले नाही. काल जे काही घडलं तेव्हा स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले नाही, त्यामुळे कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे हे सांगणे कठीण आहे... पण हेडने 'वेल बोल्ड' म्हटले नाही, तो जे पत्रकार परिषदेत म्हणाला ते खोटं आहे...
कर्णधार म्हणून खेळाडूच्या आक्रमकतेचे समर्थन करणं माझं काम- रोहित शर्मा
तर हेट आणि मोहम्मद सिराज यांच्यात झालेल्या वादावर प्रतिक्रिया देत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असेल. काल जे काही झालं त्यावेळेस माझ त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं मी खेळाकडे लक्ष देऊन होतो त्यामुळे काय बोलणं झालं ते मला कळलं नाही... सिराज हा आक्रमकपणे खेळतो, त्याच्या आक्रमकपणामुळे त्याला विकेट मिळवण्यास चांगली मदत मिळते... संघातील खेळाडूच्या आक्रमकतेचा जर संघाला फायदा होणार असेल, तर खेळाडूच्या अशा प्रकारच्या आक्रमकतेचे समर्थन करणं कर्णधार म्हणून माझं काम आहे.... सामना खेळत असताना आक्रमक होण आहे पण आक्रमक होऊन सीमारेषा ओलांडली नाही पाहिजे.... जेव्हा भारतीय आणि ऑस्ट्रेलियासरखे संघ खेळतात तेव्हा अशा गोष्टी घडतात, हा खेळाचा भाग आहे.