Smriti Mandhana Instagram
क्रीडा

'Queen Of Cricket', स्मृती मंधानाचा स्टायलिश लूक पाहून चाहते झाले घायाळ! इन्स्टाग्रामवर कमेंट्सचा होतोय वर्षाव

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना तिच्या हटके लूकमुळं प्रकाशझोतात आली आहे.

Published by : Naresh Shende

Smriti Mandhana Instagram Photos : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना तिच्या हटके लूकमुळं प्रकाशझोतात आली आहे. मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या मंधानाचे क्रिकेटविश्वात लाखो चाहते आहेत. तसच सोशल मीडियावरही मंधानाचा मोठा चाहता वर्ग आहे. कारण मंधान तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शुभविवाह नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्यात देश-विदेशातून दिग्गज सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. याशिवाय भारतीय संघाचे स्टार खेळाडूही या शाही विवाह सोहळ्यात सामील झाले होते.

भारतीय संघाच्या खेळाडूंच्या लूकने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. अशातच स्मृती मंधानानेही इन्स्टाग्रामवर जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. स्मृतीने अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, गोड संध्याकाळ...स्मृतीचा फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Smriti Mandhana

स्मृतीने लग्नसोहळ्यात गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या आऊटफिटमुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे. या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं, क्वीन ऑफ द क्रिकेट. दुसऱ्या एका युजरने म्हटलं, स्मृतीच्या सौंदर्यापुढं बॉलिवूड हिरोईन काहीच नाही. स्मृतीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत असून लाखोंच्या संख्येत लाईक्स मिळत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आशिया चषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना..

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना खरेदी करण्याचा योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार