India W vs South Africa W 
क्रीडा

आफ्रिकेविरोधात स्मृती मंधानाचं शानदार शतक! एकाच इनिंगमध्ये केले ५ मोठे विक्रम, मिताली राजच्या खास क्लबमध्येही केली एन्ट्री

टीम इंडियाला सुरुवातीला धक्का बसल्यानंतर सलामी फलंदाज स्मृती मंधानाने शानदार शतक ठोकलं. या धावांच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर २६६ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

Published by : Naresh Shende

Smiriti Mandhana Century vs South Africa : बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघात वनडे सीरिजचा पहिला सामना सुरु आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाला सुरुवातीला धक्का बसल्यानंतर सलामी फलंदाज स्मृती मंधानाने शानदार शतक ठोकलं. या धावांच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर २६६ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये स्मृती मंधानाने विक्रमी शतकाला गवसणी घातली.

दक्षिण आफ्रिकेविरोधात स्मृती मंधानाने १२७ चेंडूत ११७ धावांची शतकी खेळी केली. यामध्ये १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मंधाना ५९ धावांवर असताना तिचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण झाल्या. भारताची माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार मिताली राजनंतर हा कारनामा करणारी स्मृती मंधाना भारताची दुसरी महिला फलंदाज ठरली आहे. मितालीने तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

स्मृती मंधानाने मोडले अनेक विक्रम

स्मृती मंधानाने तिच्या वनडे करिअरमधील सहावं शतक ठोकलं आहे. तर भारतात तिने पहिलं शतक करण्याची कामगिरी केली आहे. भारतासाठी सर्वात जास्त शतक ठोकण्यात मंधाना दुसऱ्या स्थानावर आहे. तिने हरमनप्रीत कौरला मागे टाकलं आहे. मंधानाने दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसरं शतक ठोकलं. असा कारनामा करणारी मंधाना भारताची पहिली महिला फलंदाज ठरली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा