Sourav Ganguly Team Lokshahi
क्रीडा

Sourav Ganguly Bbay : सौरव गांगुलीच्या दादागिरीचे काही किस्से

दादा, महाराजा, बेंगाल टायगर अश्या अनेक नावांनी ओळखळ्या जाणाऱ्या सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे.

Published by : shweta walge

दादा, महाराजा, बेंगाल टायगर अश्या अनेक नावांनी ओळखळ्या जाणाऱ्या सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) आज वाढदिवस आहे. भारतीय संघाला आक्रमक बनवण्याचे काम दादाने केले. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत सर्वाधिक सामने भारताने जिंकले आहेत. सौरव गांगुलीची कारकीर्द जितकी यशस्वी तितकीच वादग्रस्तही होती. हे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून येते. आज आपण पाहुयात सौरव गांगुलीच्या दादागिरीचे असेच काही किस्से…

सन २००२ साली भारत इंग्लड दौऱ्यावर होता. एका सामन्यात इंग्लडच्या अँड्र्यू फ्लिंटॉपने (Andrew Flintoff) स्वतःच्या अंगातील शर्ट काढून विजयाचा जल्लोष केला होता. या मालिकेतील शेवटचा व निर्णायक सामना होता. अटीतटीच्या या सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. मग दादा काही थांबणार का? त्याने आपल्या अंगातील जर्सी काढून विजयाचा जल्लोष केला व फ्लिंटॉपला जशास तसे उत्तर दिले...

१९९८ साली बंगळुरू इथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात अम्पायरने गांगुलीला बाद घोषित केले. सौरवला हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे त्याने मैदान सोडण्यास नकार दिला. अर्थात मग गांगुलीवर एका वन डे सामन्यासाठी बंदी घातली.

२००१ हे साल गांगुली श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात पंचाने बाद घोषित केले. ज्यामुळे त्याने रागाने अम्पायरला बॅट दाखवली. त्याच सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी करत असतांना सौरवने अम्पायरच्या एका निर्णयावर तीव्र नापसंती दाखवली व अम्पायरशी वाद घातला. ज्याची शिक्षा म्हणून त्याला पुन्हा एका मॅचसाठी निलंबित करण्यात आले.

गांगुलीच्या नावावर सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकवण्याचा विक्रम आहे. तर पाकिस्तानविरुद्ध 1197 मध्ये सलग चार वेळा सामनावीर पुरस्कार त्याला मिळाला. गांगुलाचा हा विक्रम अजून कोण तोडू शकला नाही.

सौरव गांगुली 20 पेक्षा जास्त कसोटी सामने जिंकून दिले आहे. त्याचा हा विक्रम महेंद्र सिंह धोनीने नंतर तोडला. 1999 ते 2005 दरम्यान146 वनडे सामन्यापैकी 76 सामन्यात विजय मिळवला.

एककाळी मैदान गाजवणारे सौरव गांगुलीच्या खांद्यावर आता संपुर्ण भारतीय क्रिकेट संघाची धुरा आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी