क्रीडा

सौरव गांगुलीच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड; रुग्णालयात दाखल

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुली यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे.

सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू लागले होते. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

दरम्यान याआधी सौरव गांगुलीला २ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर ७ जानेवारीला गांगुलीला डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली होती.

Cards: पत्ते खेळण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

CSK vs RCB : सामन्यात पावसाने खोडा घातल्यास बंगळुरुच्या अडचणी वाढणार? काय आहे समीकरण? जाणून घ्या

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...

Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...