क्रीडा

कोहलीच्या चाहत्याकडून खास ऑफर; विराट कोहलीचे जेवढे रन, तेवढं चिकन बिर्याणीवर डिस्काऊंट

विराट कोहलीच्या या फॅनची सध्या चर्चा रंगली आहे. कोहली सामन्यामध्ये जेवढ्या धावा काढणार, चिकन बिर्याणीवर तेवढीच सवलत देण्याची ऑफर आहे.

Published by : Team Lokshahi

Virat Kohli Fan Unique Offer : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. कोहलीचे भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. जे त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. भारतातही कोहलीचा असाच एक जबरा फॅन आहे, ज्याने बिर्याणीची खास ऑफर सुरु केली आहे. विराट कोहलीच्या या फॅनची सध्या चर्चा रंगली आहे. कोहली सामन्यामध्ये जेवढ्या धावा काढणार, चिकन बिर्याणीवर तेवढीच सवलत देण्याची ऑफर आहे.

या जबरा फॅनचं नाव दानिश रिजवान आहे. दानिश उत्तर प्रदेशतील मुजफ्फरनगर येथील रहिवासी आहे. त्याने त्याच्या प्रसिद्ध 'मकबूल बिर्याणी' दुकानात खास ऑफर ठेवली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यानही रविवारी कोहलीचा वाढदिवस होता, त्या दिवशी कोहलीने शतकी खेळी केल्यामुळे चिकन बिर्याणीवर 100 टक्के सूट दिली होती. 100 टक्के सवलत म्हणजेच चिकन बिर्याणीची मोफत प्लेट शेकडो लोकांना वाटण्यात आली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा