क्रीडा

SL vs IND 2nd T20 : भारत-श्रीलंकेत आज दुसरा T20 सामना

Published by : Lokshahi News

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे मंगळवारी रद्द करण्यात आलेला T20 सामना आज खेळवला जाणार आहे. श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणारा टी-२० सामना आज बुधवारी खेळवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळा़डूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या जीवात जीव आला आहे. त्यामुळे आजचा सामना होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. यजमान श्रीलंकेसाठी हा सामना करो किंवा मरो असाच आहे.

दोन्ही संघ

भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौथम, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानिदू हसरंगा, असीन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा संदाकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा