Sunil Shetty | KL Rahul  Team Lokshahi
क्रीडा

WTC Final मधून केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर; सासरा शेट्टी म्हणाला...

राहुलवर 9 मे रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे.

Published by : Sagar Pradhan

सध्या देशात आयपीएलचा मोठा उत्साह, जल्लोष पाहायला मिळत आहे. दररोज थरारक सामने क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडे खेळाडूंमागे दुखापतीचं ग्रहण लागलं असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आरसीबीविरोधातील सामन्यादरम्यान केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. पुढील महिन्यात या दोन्ही संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यातच केएल राहुल सामना खेळू शकणार नसल्यामुळे भारतीय संघाची डोकीदुखी वाढली. या दरम्यान आता राहुलचा सासरा अभिनेता सुनील शेट्टीनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सुनील शेट्टी?

एका कार्यक्रमात सुनील शेट्टीला या संबंधी माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर बोलताना सुनील शेट्टीनं म्हटलं आहे की, ''राहुलवर 9 मे रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे. भारतीय क्रिकेट संघात अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि सगळेच सक्षम आहेत. माझ्या मते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील दुसऱ्या खेळाडूंसाठी ही संधी आहे. याशिवाय कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो.'' अशी माहिती शेट्टींनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा