Suryakumar Yadav And PM Narendra Modi Twitter
क्रीडा

"जर नशिब चमकलं तर..."; सूर्यकुमार यादवला PM मोदींना का भेटायचं होतं? ७ वर्षांपूर्वीची पोस्ट होतेय व्हायरल

टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विश्वकप चॅम्पियन बनल्यानंतर मोदींनी भारताच्या सर्व खेळाडूंना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

Published by : Naresh Shende

Suryakumar Yadav 7 Years Old Post Goes Viral : टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विश्वकप चॅम्पियन बनल्यानंतर मोदींनी भारताच्या सर्व खेळाडूंना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. अशातच सूर्यकुमार यादवची ७ वर्षांपूर्वीचा जुना फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बारबाडोस येथून भारतात परतल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सर्वात आधी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधला. याचदरम्यान स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टीनं मोदींसोबत एक खास फोटो काढला होता. त्यानंतर आता सूर्यकुमारची ट्वीटर असलेली जुनी पोस्ट पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत आहे.

जवळपास ७ वर्षांपूर्वी ३३ वर्षीय स्टार खेळाडूनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोदींच्या एका फोटोसमोर सूर्यकुमारने 'स्वच्छ भारत अभियान'चं एक पोस्टर हातात धरलं आहे. या फोटोला कॅप्शन देत सूर्यकुमारने म्हटलं होतं की, या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांचे आभार. स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन खूप आनंद झाला. जर नशिव चमकलं तर खरोखर एक दिवस तुमच्यासोबत सेल्फी घेईल.

सूर्यकुमार यादवचं ७ वर्षांपूर्वीचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे. बारबाडोसमध्ये विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या टीम इंडियाला मोदींनी खासकरून ४ जुलैला आमंत्रित केलं होतं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन सर्व खेळाडूंनी मोदींसोबत चर्चा केली.

टी-२० वर्ल्डकपमध्ये २०२४ साठी सूर्यकुमार यादवची कामगिरी

सूर्यकुमार यादवने टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केलीय. त्याने ८ इनिंगमध्ये २ अर्धशतकांच्या जोरावर १९९ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे फायनलच्या सामन्यात सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल पकडल्यानं भारतीय संघाला विजय मिळवता आला. त्यामुळे टी-२० वर्ल्डकप जिंकवण्यात सूर्यकुमारचा सिंहाचा वाटा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश