क्रीडा

IND vs SL: भारत -श्रीलंकेत आज पहिला T20 सामना

Published by : Lokshahi News

भारतीय संघ आणि श्रीलंका संघ यांच्यात आज टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. आज रात्री 8 च्या सुमारास कोलंबोच्या के. प्रेमदासा मैदानावर सुरु होईल. कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली भारत हा -20 सामना खेळणार आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघ आता टी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान या टी-20 सामन्यांसाठी भारतीय संंघात काही बदल नक्कीच केले जाणार आहेत. कारण काही टी-20 स्पेशलिस्ट खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी दिली नसल्याने त्यांना यावेळी संधी देण्यात येईल.

श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्या पहिला T20 सामना आज रात्री 8 च्या सुमारास कोलंबोच्या के. प्रेमदासा मैदानावर सुरु होईल. भारत एकदिवसीय मालिकेप्रमाणे टी-20 मालिकाही खिशात घालण्यासाठी तर श्रीलंका संघ एकदिवसीय मालिका गेली असली तरी टी-20 जिंकण्यासाठी संघात महत्त्वाचे बदल करुन रणनीती आखण्यात व्यस्त आहे.

संभाव्य भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहार, वरूण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल

Hair Growth: केस गळतीमुळे त्रस्त आहात? एकदा नक्की वापरून पाहा 'हे' जादुई तेल...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Mahayuti Sabha: आज महायुतीची जाहीरसभा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना