क्रीडा

India vs Pakistan Live : भारताचा रोमहर्षक विजय, पाकिस्तानचा दारुण पराभव

ऑस्ट्रेलियामध्ये पार पडतोय हायहोल्टेज सामना

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विराट आणि पंड्याची धमाकेदार फलंदाजी 

टीम इंडियाने 13 षटकात 4 विकेट गमावत 83 धावा केल्या आहेत. विजयासाठी 42 चेंडूत 77 धावांची गरज होती. हार्दिक पांड्या 29 आणि विराट कोहली 28 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये 41 चेंडूत 52 धावांची भागीदारी झाली.

अक्षर पटेल धावबाद

अक्षर पटेल धावबाद झाला. त्याने 2 धावा केल्या. टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.

हरिस रौफने पाठवले सूर्यकुमार यादवला पॅव्हेलियनमध्ये

सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. तो 15 धावांवर हरिस रौफने बाद झाला. टीम इंडियाने 5.3 षटकात 3 विकेट गमावत 26 धावा केल्या आहेत.

भारताला दुसरा झटका

हरिस रौफने रोहित शर्माला 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडियाची धावसंख्या 3.2 षटकात 2 गडी बाद 10 धावा.

केएल राहुल बाद

नसीम शाहने केएल राहुलची पुन्हा एकदा बाद केले आहे. भारताच्या सलामीवीराने हातांनी खेळण्याचा प्रयत्न केल्याने आणि चेंडू स्टंपकडे वळल्याने त्याला वेगवान पराभव पत्करावा लागला.

160 धावांचे भारतीय संघाला टार्गेट

मेलबर्नमध्ये भारताला 160 धावांचे लक्ष्य मिळाले.

शाहीन आफ्रिदी बाद

भुवनेश्वर कुमारने शाहीन आफ्रिदीला १६ धावांवर बाद केले. तर, शान मसूद एका बाजूने पाकिस्तानसाठी किल्ला लढवत असून अर्धशतक पूर्ण केले आहे.

पाकिस्तानला धक्यांवर धक्के! सातावा खेळाडूही माघारी

पाकिस्तानला आणखी एक धक्का मिळाला आहे. आसिफ अली मोठा फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला आहे. अर्शदीप सिंगने आसिफ अलीची विकेट घेतली. तर, दिनेश कर्तिकने झेल घेतला.

हार्दीक पांड्याची दमदार गोलंदाजी; सहावा खेळाडूही तंबूत

पाकिस्तानी संघाची विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता मोहम्मद नवाजही बाद झाला आहे. नवाजला हार्दिक पांड्याने दिनेश कार्तिकच्या हाती झेलबाद केले. नवाजने 9 धावा केल्या. पाकिस्तानची धावसंख्या सध्या सहा बाद 117 धावा आहे.

हार्दीक पांड्याच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान गारद; पाचवा खेळाडूही तंबूत

पाकिस्तानला पाचवा धक्का बसला आहे. हैदर अली दोन धावा करून बाद झाला. हैदरला हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवच्या हाती झेलबाद केले. 14.3 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 101 धावा आहे. शान मसूद 31 आणि मोहम्मद नवाज एका धावेवर आहेत.

इफ्तिखार पाठोपाठ पाकिस्तानला चौथा धक्का; शादाब खान बाद

हार्दिक पांड्याने दमदार गोलंदाजी करत शादाब खानला बाद केले आहे. त्याला केवळ पाच धावा करता आल्या आहेत.

अर्धशतक करुन इफ्तिखार अहमद बाद

केवळ ३२ चेंडूत ५१ धावा करत अर्धशतक पूर्ण करत भारतासाठी धोक्याची घंटा ठरलेल्या इफ्तिखार अहमदला मोहम्मद शमीने बाद केले आहे.

इफ्तिखार अहमदचे अर्धशतक

शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांनी पाकिस्तान संघाला सावरले आहे. त्यांच्या अर्धशतकी भागीदारी झाली. ४२ चेंडूत ५५ धावांची भागीदारी करत आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत. तर, इफ्तिखार अहमदने अक्षरच्या एकाच षटकात तीन षटकार मारले. व ३२ चेंडूत ५१ धावा करत अर्धशतक पूर्ण केले.

अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीने रिझवानही तंबूत

अर्शदीप सिंहने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला आहे. बाबर आझम पाठोपाठ मोहम्मद रिजवानही ४ धावांवर बाद झाला आहे.

बाबर आझम शून्यावर बाद

भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी गोलंदाजीची सुरुवात केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम क्रीझवर आले. रिझवानची सुरुवात चांगली झाली नाही आणि तिसऱ्या चेंडूवर तो जखमी झाला. त्यामुळे काही मिनिटे खेळ थांबला होता. तर, पहिल्या ओव्हरमध्येच अर्शदीपने पाकिस्तानला बाबरच्या रुपात पहिला धक्का दिला आहे. यामुळे भोपळा न फोडताच आझम बाबरला तंबूत परतावे लागले आहे.

भारताने टॉस जिंकला

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही प्रथम मैदानात उतरणार आहोत. आमच्याकडे सात फलंदाज, तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू आहेत, असो रोहित शर्माने सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकाला जोरदार कालपासून सुरुवात झाली आहे. आज ऑस्ट्रेलियामध्ये हायहोल्टेज सामना पार पडणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळत आहेत. पाकिस्तानचे भेदक गोलंदाज आणि भारताची विस्फोटक फलंदाजी, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरले आहेत. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. तर भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...