थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आज शनिवारी (२० डिसेंबर) मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत केली. टी२० वर्ल्ड कप २०२४ च्या विजेत्या संघातील सात दिग्गज खेळाडू या नवीन संघात स्थान मिळवू शकले नाहीत. यामध्ये माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश असून, हे तिघेही टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवडकर्त्यांनी नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देत अनुभवी खेळाडूंना ब्रेक दिल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
२०२४ च्या अंतिम १५ सदस्यीय संघातील ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि यशस्वी जायसवाल यांनाही या विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. यष्टीरक्षक पंत, वेगवान गोलंदाज सिराज आणि फिरकीपटू चहल यांची निवड होणार नाही हे आधीच निश्चित मानले जात होते. निवड समितीने युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला असून, कदाचित एखाद्याला राखीव खेळाडू म्हणून विचार केला जाईल. मात्र, अंतिम १५ मध्ये त्यांचे नाव नसेल.
टी२० विश्वचषक २०२४ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय संघ नव्या पिढीला आघाडीवर आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील हा संघ कसा प्रदर्शन करेल यावर क्रिकेटप्रेमींचे लक्ष केंद्रित झाले आहे. निवड समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे संघाची रचना पूर्णपणे बदलली असून, पुढील विश्वचषकातील कामगिरीची उत्सुकता वाढली आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026 टीम इंडियात नसलेले गेल्या विश्वचषक संघातील सदस्य
1. रोहित शर्मा
2. विराट कोहली
3. रवींद्र जडेजा
4. ऋषभ पंत
5. मोहम्मद सिराज
6. युजवेंद्र चहल
7. यशस्वी जायसवाल
टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील खेळाडू
सूर्यकुमार यादव (कर्णधार)
ईशान किशन (यष्टीरक्षक)
तिलक वर्मा
हार्दिक पंड्या
शिवम दुबे
अर्शदीप सिंग
हर्षित राणा
कुलदीप यादव
वरुण चक्रवर्ती
जसप्रीत बुमराह
वॉशिंग्टन सुंदर
संजू सॅमसन
अक्षर पटेल
रिंकु सिंह
अभिषेक शर्मा
• टी20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ जाहीर
• रोहित शर्मा, विराट कोहली आणि जडेजा संघाबाहेर
• सात दिग्गज खेळाडूंना मिळाले नाही स्थान
• सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व
• युवा खेळाडूंना संधी देण्याचा निवड समितीचा निर्णय