Indian Team T20 World Cup Team Lokshahi
क्रीडा

T20 World Cup 2022 साठी भारतीय संघ जाहीर, या दिग्गज खेळाडूंना संधी

बीसीसीआयने सोमवारी केली टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Published by : Sagar Pradhan

नुकतीच आशिया चषक स्पर्धा पार पडली. त्यांनतर लगेचच पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी- 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचा रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. या वर्ल्ड कपची सुरवात सुद्धा भारत- पाकिस्तान महामुकाबल्याने होणार आहे.

टीम मध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक दोघांना स्थान मिळालं आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलने टीममध्ये पुनरागमन केलं आहे. दोघेही दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर होते.

असा असेल टी -20 वर्ल्ड कप भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर