Team India Future Skipper 
क्रीडा

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टी-२० क्रिकेटसाठी टीम इंडियाची धुरा कोण सांभाळणार? 'या' तीन खेळाडूंची रंगलीय चर्चा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकप २०२४ चा किताब जिंकल्यानंतर या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Published by : Naresh Shende

3 Options For Team India Captaincy After Rohit Sharma Retirement : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकप २०२४ चा किताब जिंकल्यानंतर या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सामना संपल्यानंतर रोहितने पत्रकार परिषदेत म्हटलं की, हा माझा शेवटचा टी-२० क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. रोहितने अचानक निवृत्ती घोषित केल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला. अशातच आता टी-२० मध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाबाबत चर्चांना उधाण आलं आहे. टी-२० मध्ये टीम इंडियाच्या नेतृत्वासाठी अनेक विकल्प उपलब्ध आहेत. भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असेल? याबाबत जाणून घ्या.

१) हार्दिक पंड्या

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा कर्णधार बनवण्याच्या शर्यतीत हार्दिक पंड्या सर्वात पुढे आहे. त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवला होता. त्यामुळे हार्दिकला टीम इंडियाचा कर्णधार करण्याची दाट शक्यता आहे. पंड्याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला ट्रॉफी जिंकवून दिली होती. त्यामुळे हार्दिकची कर्णधारपदाची दावेदारी मजबूत झाली आहे. तो अनेक वर्षांपासून भारतीय संघासाठी खेळत आहे. त्यामुळे भारतासाठी हार्दिक एक चांगला विकल्प ठरू शकतो.

२) रिषभ पंत

भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी रिषभ पंतही एक चांगला विकल्प होऊ शकतो. त्याच्याकडे आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. याशिवाय तो एक उत्तम विकेटकीपर आहे. पंत मैदानावर असताना गोलंदाजांना नेहमीच टीप्स देत असतो. त्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यामुळे पंतही एक जबरदस्त विकल्प ठरू शकतो.

३) शुबमन गिल

भारतीय टी-२० टीमसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही निवृत्ती घोषित केली आहे. त्यामुळे या जागेवर शुबमन गिलची निवड केली जाऊ शकते. शुबमनही कर्णधारपदासाठी एक चांगला दावेदार होऊ शकतो. शुबमनकडेही संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा