क्रीडा

अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व; न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

Published by : Lokshahi News

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे तर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याचसोबत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

न्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत कसोटीसोबत तीन टी-२० सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील.

कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल.

भारतीय संघ:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

कसोटी सामने

पहिला कसोटी सामना- २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, कानपूर
दुसरा कसोटी सामना- ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर, मुंबई

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mangal Prabhat Lodha : 'आंदोलन करणारा जैन समाज नव्हता, बाहेरचे होते'

RBI Repo Rate : रेपो दर कायम, कर्जदारांना दिलासा

Heart Attack : Nashik : सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Dadar Kabutar Khana : कबुतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक; आंदोलकांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली