T20 World Cup 2024 
क्रीडा

IND vs CAN, T20 World Cup: भारत विरुद्ध कॅनडा सामन्याआधी पावसाने वाढवली चिंता, टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन रद्द

फ्लोरिडात खराब वातावरण आणि पावसामुळं भारतीय संघाचं प्रॅक्टिस सेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published by : Naresh Shende

Team India Practice Session Cancelled, IND vs CAN : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आता भारत ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना १५ जूनला कॅनडाविरोधात खेळणार आहे. हा सामना सुरु होण्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लोरिडात खराब वातावरण आणि पावसामुळं भारतीय संघाचं प्रॅक्टिस सेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फ्लोरिडात गेल्या काही दिवसांपासून सलग पावसानं थैमान घातलं आहे. आज शुक्रवारी फ्लोरिडात पाऊस पडण्याची ७०-८० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे फ्लोरिडात होणाऱ्या या सामन्याला पावसाचा फटका बसू शकतो. सामन्यादरम्यानही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. भारताने हे तिन्ही सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात आलेले सर्व सामने भारताने जिंकले आहेत. भारताने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात आर्यलँडचा ८ विकेट्सने पराभव केला.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर भारताने तिसऱ्या सामन्यातही अमेरिकेचा पराभव करून विजय मिळवला. भारताने ७ विकेट्सने यूएसएचा पराभव करून सामना खिशात घातला. आता भारतीय संघ कॅनडाविरोधात सामना जिंकून मिशन बारबाडोससाठी सज्ज होईल, अशी आशा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Suprime Court : निष्काळजी वाहनचालकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विमा भरपाई नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल