T20 World Cup 2024 
क्रीडा

T20 World Cup: 'सुपर 8' मध्ये टीम इंडियाची एन्ट्री! 'अशी' असेल संभाव्य प्लेईंग ११; अफगानिस्तानचा उडवणार धुव्वा

ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानावर राहिल्याने भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रेवश केला आहे. या ग्रुपमधील भारताचा पहिला सामना २० जूनला अफगानिस्तान विरोधात होणार आहे. तत्पूर्वी जाणून घेऊयात भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग ११

Published by : Naresh Shende

India vs Afghanistan, T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपच्या लीग सामन्यांमध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर कॅनडाविरोधात असलेला ग्रुप ए चा सामना काल शनिवारी पावसामुळे रद्द झाला. ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानावर राहिल्याने भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रेवश केला आहे. या ग्रुपमधील भारताचा पहिला सामना २० जूनला अफगानिस्तान विरोधात होणार आहे. तत्पूर्वी जाणून घेऊयात भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग ११

रोहित-कोहली सलामीला उतरू शकतात

सुपर-८ सोबत नॉक आऊटचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. येथील कॅरेबियन खेळपट्टीवर विराट कोहलीने अप्रितम खेळी केल्या आहेत. अशात रोहित शर्मासोबत विराट कोहली पुन्हा एकदा सलामीला उतरण्याची शक्यता आहे.

या खेळाडूंवर असेल मध्यमक्रमची जबाबदारी

मध्यमक्रमची जबाबदारी ऋषभ पंतसोबत अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून ऋषभ पंतने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसच यूसएविरोधात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केलीय.

४ अष्टपैलू खेळाडूंसह मैदानात उतरणार रोहित शर्माची पलटण

लीग सामन्यांमध्ये ४ अष्टपैलू खेळाडूंसोबत मैदानात उतरल्याने भारतीय संघाचं समतोल चांगला राहिल्याचं पाहायला मिळालं. अशातच रोहित शर्मा सुपर ८ च्या सामन्यांमध्येही चार अष्टपैलू खेळाडूंना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल करताना दिसत आहेत. परंतु, रवींद्र जडेजाला गोलंदाजीसह फलंदाजीतही आतापर्यंत चमकदार कामगिरी करण्यात यश आलेलं नाही. खेळपट्टी पोषक असल्यास जडेजाही मैदानात जलवा दाखवेल, अशी आशा आहे. याशिवाय शिवम दुबेला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. पण दुबेनं .यूसएविरोधात सामन्यात अप्रतिम फलंदाजी केल्यानं तो फॉर्ममध्ये आला आहे.

अफगानिस्तानविरोधात टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११

विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका