क्रीडा

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज..वनडे – टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर

Published by : Lokshahi News

भारतीय संघाचा पुढील महिन्यात श्रीलंका दौरा असणार आहे. या दोऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेसोबत ३ वनडे आणि ३ टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. १३ जुलै ते २५ जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेत सामने होणार आहेत.

भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्या कारणाने श्रीलंका दौऱ्यासाठी युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाणार आहे. यात चेतन साकारिया, हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. शिखर धवनच्या हातात भारतीय संघाची कमान असू शकते. आगामी टी-२० वर्ल्डकपला समोर ठेऊन निवडकर्ते या दौऱ्याकडे आणि खेळाडूंकडे लक्ष ठेवणार आहेत.

श्रीलंका दौरा

वनडे मालिका

१३ जुलै – पहिला वनडे सामना
१६ जुलै – दुसरा वनडे सामना
१८ जुलै – तिसरा वनडे सामना

टी-२० मालिका

२१ जुलै – पहिला टी-२० सामना
२३ जुलै – दुसरा टी-२० सामना
२५ जुलै – तिसरा टी-२० सामना

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य