Team India 
क्रीडा

टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचणार? ऑस्ट्रेलियानं पराभव केल्यास वाढणार टेन्शन; जाणून घ्या पूर्ण समीकरण

सुपर ८ मध्ये प्रत्येक दिवस रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. ग्रुप १ मध्ये अफगानिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सेमीफायनलच्या शर्यतीत आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

Published by : Naresh Shende

Team India Semifinal Qualification Scenarious T20 WorldCup 2024 : आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्डकप २०२४ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. सुपर ८ मध्ये आता चारच सामने राहिले आहेत. त्यानंतर २ सेमीफायनल आणि फायनलचा सामना रंगणार आहे. सुपर ८ मध्ये प्रत्येक दिवस रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. ग्रुप १ मध्ये अफगानिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सेमीफायनलच्या शर्यतीत आपलं स्थान कायम ठेवलं आहे. ग्रुप १ मध्ये भारतीय संघाने सलग २ सामने जिंकले आहेत, तरीही टॉप ४ मध्ये टीम इंडिया पोहोचली नाहीय. अशातच ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सामन्यात भारताने विजय संपादन केल्यास संघ थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री करेल. जर टीम इंडियाचा पराभव झाला, तर सेमीफायनलचं समीकरण बदलेल.

टीम इंडिया सेमीफायनलमध्ये कशी पोहोचणार?

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरोधात होणारा सामना जिंकावा लागेल. कारण सुपर ८ च्या तीन सामन्यांच्या विजयानंतर भारताला ६ गुण मिळतील. त्यानंतर भारताला टॉप-४ मध्ये जागा मिळेल. ऑस्ट्रेलियाने कमी मार्जिनने सामना जिंकला, तर भारतीय संघ नेट रनरेटनुसार सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की करेल. भारत-ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यास टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहचेल.

ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयामुळं भारताचं टेन्शन वाढेल

भारत ऑस्ट्रेलियाविरोधात होणारा शेवटचा सामन्यात पराभूत झाला आणि अफगानिस्तानने बांगलादेशविरोधात होणारा शेवटचा सामना जिंकला, तर तीन्ही संघांकडे प्रत्येकी ४ गुण असतील. परंतु, ऑस्ट्रेलियाने ४१ आणि त्यापेक्षा जास्त धावांनी भारताचा पराभव केला आणि दुसरीकडे अफगानिस्तानने बांगलादेशला ८३ किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी हरवल्यास टीम इंडिया टूर्नामेंटमधून बाहेर होईल.

ग्रुप ए मधून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, ऑस्ट्रेलिया कर्णधार मिचेल मार्शने अफगानिस्तानचा पराभव केल्यानंतर स्पष्ट म्हटलंय की, त्यांना सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी भारतासारख्या मजबूत संघाचा पराभव करावा लागेल. ही एक जबरदस्त संधी असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य

iPhone17 मार्केटमध्ये लॉन्च ; जाणून घ्या 'ही' वैशिष्ट्य

Hollywood Star Robert Redford : मोठी बातमी! हॉलिवूडचा ‘गोल्डनबॉय’ रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन