India vs Zimbabwe  Google
क्रीडा

IND vs ZIM: सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी; संजूनं गड राखला; भारताचं झिम्बाब्वेला १६८ धावांचं आव्हान

झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून झिम्बाब्वेला १६८ धावांचं आव्हान दिलं आहे.

Published by : Naresh Shende

India vs Zimbabwe 5th T20 : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये रंगत आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेविरोधात मागील तिनही सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून टी-२० मालिका खिशात घातली. दरम्यान, आजच्या पाचव्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून झिम्बाब्वेला १६८ धावांचं आव्हान दिलं आहे. संजू सॅमसनच्या (५८) अर्धशतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात यश आलं.

चौथ्या टी-२० सामन्यात वादळी खेळी करून अर्धशतक ठोकणाऱ्या कर्णधार शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालला या सामन्यात मात्र स्वस्तात माघारी परतावे लागले. जैस्वाल १२ धावांवर असताना झिम्बाब्वेच्या कर्णधार सिंकदर रझाने त्याचा त्रिफळा उडवला. तर एनग्रावाच्या गोलंदाजीवर गिल १३ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मालाही धावांचा सूर गवसला नाही. मुझारबानीच्या गोलंदाजीवर शर्मा १३ धावांवर असताना बाद झाला.

भारताचे सलामीचे फलंदाज तंबुत परतल्यानंतर संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी साकारली. संजूने ४५ चेंडूत ५८ धावा केल्या. यामध्ये ४ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. रियान परागने २४ चेंडूत २२ धावा केल्या. तर शिवम दुबेनं १२ चेंडूत २६ धावा कुटल्या. यामध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझा, रिचर्ड आणि ब्रँडणने प्रत्येकी १ विकेट घेतली. तर मुझारबानीला २ विकेट घेण्यात यश मिळालं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी