India vs Srilanka Twitter
क्रीडा

IND vs SL: टीम इंडिया चमकणार! सूर्यकुमार यादव भारताचा नवा कर्णधार, हार्दिक उपकर्णधारही नाही, 'या' खेळाडूंना डच्चू

श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

Published by : Naresh Shende

Team India T20 And ODI Squad Announced: श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या नव्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवला देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्या या संघाचा उपकर्णधारही नसणार आहे. शुबमन गिलला भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार करण्यात आला आहे. गिलने नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं.

भारतीय संघाची निवड करण्यात आली असून ऋतुराज गायकवाडचा या स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला नाहीय. रिपोर्टनुसार, संजू सॅमसनला उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येणार होती. परंतु, तो आता विकेटकीपर-फलंदाज म्हणून संघासाठी खेळेल. तसच झिम्बाब्वे दौऱ्यावर परार्पण करणाऱ्या अभिषेक शर्मालाही या स्क्वॉडमध्ये संधी देण्यात आली नाही.

श्रीलंके विरुद्ध भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

श्रीलंके विरुद्ध भारताची वनडे टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, के एल राहुल (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदिप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच